साखळोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेल्या 'रक्षक सापळा'या फळमाशी नियंत्रण तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिकासह स्थापना करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय, दापोली अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमातील 'कृषी संगिनी' विद्यार्थीनींनी केले. यावेळी शेतकऱ्यांना आंबा, पेरू व इतर फळपिकांमध्ये फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान, त्याचे व्यवस्थापन तसेच रक्षक सापळ्याची कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
सापळ्याचा योग्य वापर केल्यास फळमाशीचे प्रभावी निरीक्षण व नियंत्रण होऊन रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठाने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचा कोकणातील फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असून फळमाशी नियंत्रणासाठी ते प्रभावी साधन ठरत आहे. या प्रात्यक्षिकाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सापळ्याच्या वापराबाबत विविध शंकांचे निरसन करून घेतले. कृषी संगिनी समूहाने भविष्यातही अशा शेतकरी हिताच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व जनजागृती उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.