रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज बस थांब्यावर घरी जाण्यासाठी एसटीबसमध्ये प्रवेश करणार्या छोट्या विद्यार्थिनींना पास नाकारत, पैसे भरा असे उर्मटपणे बोलून त्यांना दरडावत बसमधून खाली उतरवणार्या चालक-वाहकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक आणि भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चिराग खटकुळ यांनी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागप्रमुखांकडे केली आहे. नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर अॅण्ड ज्युनिअर कॉलेज नाणीज येथे पंचक्रोशीतील खानु, कशेळी, कंरंजारी, घाटीवळे, देवळे परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता लांजा आगाराची पाली-घाटीवळे ही बस नाणीज बस थांब्याजवळ थांबली असता, त्यात शाळेच्या चार विद्यार्थी बसमध्ये प्रवेश केला.
यावेळी छोट्या विद्यार्थिंनीना तुम्ही शाळेच्या स्टॉपजवळ का थांबला नाहीत, या स्टॉपवर का आलात अशी विचारणा केली. त्यांच्याकडे प्रवासाचा पास असतानाही, बसच्या चालक व वाहकाने त्यांच्याशी उर्मट वर्तणूक केली व दरडावले. पास असूनही त्यांच्याकडे तिकीटाच्या पैशाची मागणी केली. त्यानंतर या विद्यार्थिनींना बसमधून खाली उतरवून बस पुढे नेली. चालक व वाहकाच्या या दमदाटीमुळे विद्यार्थिनी घाबरुन थांब्यावरच रडत राहिल्या आणि नंतर घरी गेल्या. या वाहकाकडून विद्यार्थ्यांशी यापूर्वीही अशाच पध्दतीची गैरवर्तवणूक झालेली आहे. त्यामुळे या मुजोर चालक व वाहकांवर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी लांजा आगाराला देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
यावर पालक पूजा बोडेकर, संदेश मावळणकर, प्रकाश गोरे, विक्रांत शिंदे यांनी सह्या केल्या आहेत. तर भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चिराग खटकूळ, सुशांत पाटकर, तालुका सरचिटणीस भाजप, रत्नागिरी दक्षिण, तालुकाध्यक्ष शिक्षक सेल विजय गावडे, भाजपा कार्यकर्ते श्रीराम दाणी आणि पालकांनी विभाग नियंत्रणकांना निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.