loader
Breaking News
Breaking News
Foto

गोवा दोडामार्ग मधिल बाराहुन जास्त पायी वारीचे विठ्ठल नामाच्या जयघोषात गेल्या तीन दिवसांपासून प्रस्थान सुरू, हजारो वारकरी सहभागी

दोडामार्ग, दि. १२ जुलै प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत सखुबाई, संत मुक्ताई, यांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला लाखो भाविक पंढरपूर नगरीत दाखल होतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, विविध राज्यातून लाखो वारकरी भक्त दाखल होतात २५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्ताने गेल्या तीन दिवसांपासून गोवा ,दोडामार्ग, हजारो वारकरी मंडळी विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठया उत्साहात पंढरपूर कडे प्रस्थान सुरू केले आहे. निघणाऱ्या या पायी दिंडया सोबत विठ्ठल रखुमाई पालख्या यामुळे दोडामार्ग ते विजघर कोल्हापूर महामार्ग भक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग गोवा डिचोली तालुक्यातील डिचोली, सर्वण, पिळगाव, मुळगाव, अस्नोडा, पीर्णा, नानोडा, कुडचडे, वझरे, माटणे, दोडामार्ग, सासोली, मणेरी, अशा अनेक गावातून हजारो वारकरी महिला पुरुष, आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर पायी वारी करीता रवाना होत आहेत. दोडामार्ग येथून गेले तीन दिवस वारकरी मंडळी पायी चालत जात आहेत.

टाइम्स स्पेशल

दोडामार्ग तसेच गोवा राज्यातील या वारकरी बांधवाचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. काही किलोमीटर अंतरावर राञी, जेवण मुक्काम, सकाळी नाष्टा, दुपारी जेवण थोडा मुक्काम पुढचा प्रवास असा प्रवास सुरू झाला आहे. वारकरी मंडळी कडून केले जाणारे नामस्मरण, विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी जयघोष, संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम, महाराज यांचा जयजयकार त्यांचे अभंग हे पायी वारी मधिल वारकरी बांधवांना नवीन उत्साह देत आहे. यामुळे वारकरी मध्ये कुठला थकवा जाणवत नाही. विठ्ठल आमच्या पाठीशी ही श्रध्दा घेऊन ही वारकरी मंडळी वाटचाल करत आहेत. यात महिला वारकरी देखील मोठया संख्येने सहभागी झाल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg