संगमेश्वर (प्रतिनिधी) -संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावरील संगमेश्वर ते देवरुख हा रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाला असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संगमेश्वर ते बुरंबी या पट्ट्यातील खड्डे भरून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे हे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत.
रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान होत असून अपघाताची भीतीही वाढली आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. पावसाळा सुरू असतानाच कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.