loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड-जामसंडे शहरातील विविध रस्ते विकासकामांसाठी १.२० कोटींचा निधी मंजूर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांना यश – नगराध्यक्ष साक्षी प्रभू

देवगड (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विविध रस्ते विकासकामांसाठी राज्य शासनाने १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, ही कामे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी दिली. राज्य शासनाच्या "राज्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अधिभारातून रस्ता अनुदान (अनिवार्य)" या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासकामांना गती मिळणार असून नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंजूर कामांमध्ये केळुसकर घर ते तारामुंबरी विठ्ठल मंदिरपर्यंत उर्वरित रस्ता, जामसंडे सातपायरी मुख्य रस्ता (हॉटेल डायमंड ते तुळशीनगर जोडरस्ता) व भूमिगत गटार, शिवनगर येथील बापर्डेकर घरापर्यंत रस्ता खडीकरण, डांबरीकरण व नूतनीकरण, तसेच देवगड-निपाणी मुख्य रस्ता ते गणपती मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व नूतनीकरण या कामांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी सांगितले की, शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देत विशेष सहकार्य केले. त्यामुळेच शहरासाठी महत्त्वपूर्ण असा हा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांमुळे शहरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचा लाभ मिळेल. सर्व कामे शासनाच्या नियमानुसार, पारदर्शक पद्धतीने आणि गुणवत्तेला प्राधान्य देऊन पूर्ण करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg