संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील धोधाणी परिसरात रविवारी दुर्दैवी घटना घडली. वाघाची वाडी येथील नदीपात्रात पोहत असताना दोन तरुण प्रचंड प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा अद्याप बेपत्ता आहे. धोधाणी येथील वाघाचीवाडी परिसरात सुमारे दहा जणांचा मित्रांचा गट मौजमजेसाठी गेला होता. मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असतानाच नयन म्हात्रे आणि सुमित यशवंत पवार हे दोघे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले.
इतर मित्रांनी अथक प्रयत्न करून सुमित पवार याला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोघेही तरुण विचुंबे गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नयन म्हात्रे हा तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सततचा मुसळधार पाऊस आणि नदीतील वाढलेला पाण्याचा प्रवाह यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
धोधाणीचे पोलीस पाटील यांनी बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आहे. या घटनेमुळे विचुंबे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पावसाळ्यात नद्या, ओढे आणि धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह क्षणार्धात वाढत असल्याने नागरिक आणि पर्यटकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पुन्हा करण्यात येत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.