loader
Breaking News
Breaking News
Foto

कळणे गावातील पोलीस दूर क्षेत्र इमारत मोजतेय अखेरच्या घटका

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग पोलीस ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात जोडल्या गेलेल्या तसेच कायद्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असणारी कळणे गावातील पोलीस दूरक्षेञ इमारत आज धुळखात पडली आहे. या इमारतीची डागडुजी करा किंवा नवीन इमारत बांधा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. पण पोलीस प्रशासन किंवा बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. सुरू झालेल्या पावसामुळे या इमारतीवर झाडांची फांदी पडली आहे. भाग कोसळत आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन कळणे गावातील पोलीस दूरक्षेञ इमारत नवीन उभी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कळणे गावातील पोलीस दूरक्षेञ गजबजलेले असायचे येथून गोवा राज्य सीमा जवळ आहे. पण गेल्या काही वर्षांपासून कळणे गावातील पोलीस दूरक्षेञ इमारत नवीन उभी करण्यासाठी प्रयत्न झाले नाही. यामुळे आजची विदारक परस्थिती पाहून मन सुन्न होते. तेव्हा या ठिकाणी पाच सहा पोलीस कर्मचारी होते. बांदा पोलीस ठाणे होते, तेव्हा पासून कळणे पोलीस दूरक्षेञ सुरू होते. कळणे गावातील पोलीस दूरक्षेञ इमारत नवीन बांधकाम करावे यासाठी कळणे भिकेकोनाळ सरपंच अजित देसाई, यांनी वरिष्ठ पातळीवर बांधकाम विभाग यांना पञव्यवहार केला. पण प्रशासनाकडून अद्याप हालचाली झाल्या नाहीत. कळणे दशक्रोशीतील गावावर लक्ष ठेवणारे कळणे पोलीस दूरक्षेञ इमारत आज अखेरची घटना मोजत आहे.

टाईम्स स्पेशल

सुरू असलेल्या पावसामुळे या पोलीस दूरक्षेञ इमारतीवर झाडाची फांदी पडलेली आहे. ती बाजूला केली नाही. यामुळे संपूर्ण पोलीस दूरक्षेञ इमारत नेस्तनाबूत होणार आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग व पोलीस प्रशासन यांनी कळणे पोलीस दूरक्षेञ इमारत नवीन बांधकाम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सरपंच अजित देसाई यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg