loader
Breaking News
Breaking News
Foto

जामसुत जांभुर्णेवाडी येथील तुरेवाले शाहीर व सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अशोक कुंभार यांचा सत्कार

वरवेली (वार्ताहर) - गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथील नामवंत तुरेवाले शाहीर व सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अशोक दत्ताराम कुंभार यांचा सत्कार मुंढर शिरबारवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये गुहागर तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आला. यावेळी गुरुवर्य ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर, ह.भ.प. बबन कुंभार महाराज यांच्यासह गुहागर तालुक्यातील नामवंत कीर्तनकार व वारकरी उपस्थित होते. जामसुत जांभुर्णेवाडी येथील श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळाचे नामवंत तुरेवाले शाहीर, कवी म्हणून ह.भ.प. अशोक दत्ताराम कुंभार हे संपूर्ण जिल्हाभर प्रसिद्ध आहेत. तसेच वारकरी सांप्रदायामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अशोक दत्ताराम कुंभार यांचा नावलौकिक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली २५ वर्षे जाखडी नृत्य कलेमध्ये तुरेवाले शाहीर म्हणून गायन करत आहेत. लहानपणापासूनच त्यांना गायनाची आवड होती. जाकडी नृत्यातील सर्व गीते त्यांनी स्वतः लिहिली आहेत. एक उत्तम पहाडी आवाजाचा गायक म्हणून त्यांचं नाव आहे. संपूर्ण जिल्हाभर तसेच मुंबई येथे त्यांचा नाचाचा कार्यक्रम सतत पार पडत असतो. मुंबई डोंबिवली येथे आगरी महोत्सवामध्ये झालेल्या जाखडी नृत्यांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली होती. वराती देवी मंडळ खालचा पाट येथे झालेल्या जिल्हास्तरीय जाखडी नृत्य स्पर्धेमध्ये त्यांच्या मंडळाला तिसरा क्रमांक मिळाला होता.

टाईम्स स्पेशल

द्वादशी कीर्तन सेवा मंडळ वेळंब वचनवाडी पंचक्रोशी च्या माध्यमातून ते विविध ठिकाणी कीर्तनाचे सुद्धा कार्यक्रम करत आहेत. त्यांचे गुरुवर्य ह.भ.प. बबन महाराज कुंभार असून त्यांच्याच मार्गदर्शनखाली त्यांनी कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं नावलौकिक प्राप्त केले आहे. गेली दहा वर्षे ते कीर्तन सेवा करत आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाज जनजागृती व अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम ते अविरतपणे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg