loader
Breaking News
Breaking News
Foto

जल फाऊंडेशनला 'विशेष कोकण सन्मान' प्रदान

खेड (प्रतिनिधी) - सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आम्ही कोकणकर संस्थेच्या वतीने जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेला जाहीर झालेला विशेष कोकण सन्मान पुरस्कार 'हास्यजत्रा' फेम शिवाली परब यांच्याहस्ते संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव व सल्लागार वसंत मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दादर-मुंबई येथे झालेल्या सोहळात स्वीकारला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जाधव यांच्यासह सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्यासाठी पदाधिकारी तप्तर असतात. विशेषतः दुर्गम भागातील ग्रामस्थांना भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या संपुष्टात आणून ग्रामस्थांची भटकंती थांबवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आजवर प्रामाणिक प्रयत्न झाले आहेत. विंधन विहिरींसह साठवण टाक्यांची उपलब्धतता करून देत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे.

टाईम्स स्पेशल

वैद्यकीय क्षेत्रातही भरीव कामगिरी करताना गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्यासह अद्ययावत रुग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे प्रयत्न केले जात आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करत आजवर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अलौकिक कार्याची दखल घेत विशेष कोकण सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg