loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शेर्ले येथील श्री रवळनाथ मंदिराच्या दर्शनी भागाचा काही हिस्सा अतिवृष्टीमुळे कोसळला

बांदा (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील श्री रवळनाथ मंदिराच्या दर्शनी भागाचा काही हिस्सा गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी परिसरात भाविकांची वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मंदिराच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराच्या लाकडी छपराला तडे गेले होते. अखेर अतिवृष्टीमुळे दर्शनी भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला. प्रशासनानेही घटनास्थळी पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg