मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील देवबाग येथील श्री देव विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी उद्या बुधवार, दि. २२ जुलै पासून २९ जुलै २०२६ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम, भजन सेवा, दिंड्या, दशावतार खेळ आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता मंदिरात कुमारिका पूजन होईल. त्यानंतर श्री देव विठ्ठल-रखुमाईसह परिवार देवतांना गाऱ्हाणे घालून अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. या सप्ताहातील प्रमुख आकर्षण म्हणजे आषाढी एकादशीचा उत्सव. या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन श्री विठ्ठल-रखुमाईंचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची भाविकांना दुर्मिळ संधी मिळते.
वर्षभर ब्राह्मण पुजाऱ्यांशिवाय इतर कोणालाही गाभाऱ्यात प्रवेश नसतो. आषाढी एकादशीला काकड आरती, श्रींच्या मूर्तीवर अभिषेक व नित्यपूजा झाल्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनास प्रारंभ होईल. सायंकाळी ५ वाजता तारकर्ली येथील तारी घराण्याची दिंडी, देवबाग भांजीवाडीची दिंडी तसेच भाटकर घराण्याची दिंडी मंदिरात दाखल होईल. भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि अखंड हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाईल. सप्ताहाच्या समाप्तीच्या पूर्वसंध्येला मांजरेकर घराण्याची दिंडीही श्रींच्या दर्शनासाठी येणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पंचक्रोशीतील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. गुरुपौर्णिमेनिमित्त दुपारी दशावतारातील विविध खेळ सादर करण्यात येणार असून त्यानंतर समुद्रस्नान करून ओल्या अंगाने श्रीकृष्णाची आरती केली जाईल.
यावेळी उपस्थित भाविकांना लाह्या व दह्याचा प्रसाद वाटप करण्यात येईल. तसेच पुढील एका दिवशी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी भजन सेवा सादर करण्यासाठी ९१४५३८०३४०, ९४०५२२६०३१ किंवा ७४९८१६१५३८ या क्रमांकांवर संपर्क साधावा. भजन सेवा करणाऱ्या मंडळांना प्रवास खर्च तसेच चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री विठोबा देवालय देवबागचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.