loader
Breaking News
Breaking News
Foto

दिलीप राणे यांची रत्नागिरी जिल्हा डोंगरी विभाग विकास समितीच्या सदस्य पदी निवड

खेड - ग्रुप ग्रामपंचायत तुळशी खुर्द/ बुद्रुकचे माजी सरपंच भरणे विभागाचे शिवसेना विभाग प्रमुख तसेच न्यू इंग्लिश स्कूल खवटी व पि.के. दरेकर ज्युनिअर कॉलेजचे विद्यमान अध्यक्ष दिलीप श्रीपतराव राणे यांची रत्नागिरी जिल्हा डोंगरी विभाग विकास समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाली. अनेक वर्षाच्या निस्वार्थ समाजसेवेची प्रामाणिक नेतृत्वाची जनते प्रती असलेल्या बांधिलकीची आणि विकासाभिमूक कार्याची योग्य दखल नेतृत्वाने घेऊन त्यांची निवड केली. सामान्य माणसाच्या सुखदुःखात कायम सहभागी होत शिक्षण सामाजिक कार्य आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेला संघर्ष आज या पदाच्या निमित्ताने फळाला आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राणे यांच्या अनुभवाचा दूरदृष्टीचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगरी भागातील नागरिकांना निश्चितच होईल. त्याचप्रमाणे राणे यांच्या माध्यमातून विकासाची नवी दालने खुली होतील. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि सर्वसामान्य जनतेच्या आशा अपेक्षांना नवी दिशा मिळेल. अनेक वर्षे फळाची अपेक्षा न धरता संघटनेचे काम राणे यांनी केले योगेश दादा युवा सेनेचे पदाधिकारी असताना त्यांना खंबीरपणे साथ दिली. संघटनेत खडतर प्रवास केला संघटनेने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय दुर्गम परंतु मुलभूत सुविधा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.

टाईम्स स्पेशल

घरामध्ये कोणताही शैक्षणिक व राजकीय वारसा नसताना देखील त्यांनी आपल्या सामाजिक जीवनामध्ये यश मिळवले. शांत व संयमी स्वभावामुळे सर्वांना हवेसे वाटणारे नेतृत्व आज जिल्ह्याला लाभले आहे. शिवसेना नेते रामदास भाई कदम व गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांची समर्थ साथ दिलीप राणे यांना नेहमीच लाभली. योगेश दादांमुळेच हे पद मला मिळाले आहे, असे दिलीप राणे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg