loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी पटकावले ४ सुवर्ण व ३ कांस्य पदक

लांजा (संजय साळवी) - जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४ सुवर्ण व ३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगर पंचायत देवरुख, तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्योरुगी व पुमसे स्पर्धा दि. १० ते दि. १२ जुलै या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४ सुवर्ण व ३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. स्वर्णीम श्रेयस शेट्ये, योगेश ईश्वर तोंडारे, भक्ती भागवत कुंभार व तेजस्वी दशरथ लाड हे सुवर्णपदक विजेते ठरले आहेत. अमायरा मोहसीन अपराध, माऊली तुषार चव्हाण व वृत्ती रंजन पावसकर कांस्यपदक विजेते ठरले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत युगा डोर्ले, अन्वी पवार, रंजन पावसकर, दीपराज खानविलकर, तनया पाटकर, आर्या पवार, सात्विक साळुंखे, रिया लांजेकर, आराध्य सावंत व आदिश्री शेट्ये हे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत लांजा अकॅडमीच्या सचिव तसेच राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून उत्कृष्ट काम पाहिले. सर्व खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, प्रमुख प्रशिक्षिका शितल आचरेकर व सहप्रशिक्षक गौरव खेडेकर, गणेश तोंडारे यांचे मार्गदर्शन लाभले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg