देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा जंगलवाडीचे मुख्याध्यापक महेश गणपत कांबळे यांची नुकतीच शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल जंगलवाडी ग्रामस्थांच्या वतीने नुकताच महेश कांबळे यांचा सपत्नीक भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. गेली दोन वर्षे ते या शाळेत कार्यरत होते. अत्यंत शांत, साध्या पण मनमिळाऊ स्वभामुळे जंगलवाडी पंचक्रोशीत ते परिचित होते. जंगलवाडीतील ग्रामस्थांचे शाळेला नेहमीच सहकार्य असते. ते मिळवण्यासाठी या छोट्या शाळेत शैक्षणिक सहल वनभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, असे सहशालेय उपक्रम राबवून पालक व ग्रामस्थांना शाळेच्या कार्यात सहभागी करून घेत असत.
शालेय अभ्यासक्रमाबरोबर मंथनसारख्या स्पर्धा परीक्षेचे केंदस्तरारावर आयोजन त्यांनी उत्तम प्रकारे केले. महेश कांबळे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेने नुकतीच शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती दिली. त्यामुळे त्यांची बदली झाली. त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप गार्डी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावकर व माजी शिक्षक यशवंत घागरे, शिक्षण तज्ञ कृष्णा घागरे, पोलिस पाटील विजित साळवी, स्नेहल घागरे, माजी मुख्याध्यापिका नेहा दर्डी, दर्डी गुरुजी, सुनील घागरे, शंकर गार्डी, ग्रामपंचायत सदस्य योगेश गार्डी, सुरेश हतपले, संजय घागरे, मोहन गार्डी, सुभाष गार्डी, निलेश गराटे, निलेश गार्डी तसेच अनेक ग्रामस्थ, महिला, आजी - माजी विद्यार्थी मुख्याध्यापक सीताराम करंबेळे उपस्थित होते.
यावेळी पोलिस पाटील विजित साळवी, हतपले, निलेश गार्डी, स्नेहल घागरे, दर्डी मॅडम, कृष्णा घागरे, यशवंत घागरे यांनी कांबळे गुरुजींच्या कार्याचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना कांबळे गुरुजी यांनी सांगितले की सर्वांचा निरोप घेताना जड अंतःकरणाने घ्यावा लागतो आहे. मिळालेली संधी पुन्हा मिळणार नाही. या जंगलवाडीतील सर्व ग्रामस्थांची, त्यांच्या सहकार्याची नेहमी आठवण येईल. अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीताराम करंबेळे यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.