दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोडीला बंदी असूनही उसप, पिकुळे डोंगर भागातील सीमा भागात प्रस्तावीत असलेल्या काळा दगड उत्खनन व कृत्रिम करणारा प्रकल्पासाठी हालचाली सुरू आहेत. या प्रकरणी ग्रामस्थांच्या पाठीशी स्थानिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व संपूर्ण पक्ष राहिल. जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा तालुका प्रमुख संजय गवस व शाखा प्रमुख सुरेश गवस यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उसप गावातील स.न.३६० मध्ये गायरान जमिन असून या जमिनीत गोव्यातील एका उद्योजकाने येथे काळा दगड उत्खनन व कृत्रिम वाळू प्रकल्पासाठी जिल्हा अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे परवानगी मागितली आहे. अशा प्रकारची माहिती स्थानिक प्रशासनाकडे आल्याने ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. सदर जमीन ही पिकुळे, उसप सीमेवर असून दोन्ही गावांना याचा भविष्यात दुष्परिणाम भोगावा लागणार आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात काजू बागायत, जंगले आहेत. वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार असून काजू बागायती उत्पन्नावर परिणाम होणार. असा प्रकल्प शासन जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पाच्या विरोधात व जनतेच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उभा राहिल, असे मत संजय गवस यांनी व्यक्त केले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.