loader
Breaking News
Breaking News
Foto

रिजिजू म्हणाले- नीट पेपरलीक वर चर्चेसाठी सरकार तयार, त्यावर अखिलेश यादव संतापले, सभागृहात गोंधळ

नवी दिल्ली - केद्रिय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. विरोधी पक्षांची मागणी असल्याने सरकारने नीटपेपरलीक बाबत चर्चेची तयारी दाखवली. मात्र विरोधक धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अडून राहिले. गोंधळ सुरुच राहिला. लोकसभा स्पिकर ओम बिर्ला यांनी सभागृहाची कार्यवाही २ वाजेपर्यंत स्थगित केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेमध्ये सांगितले की, सरकार नीटपेपर लीकबाबत चर्चा करण्यास तयार आहे. त्याचवेळी विरोधकांनी आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाई झाल्याबाबत गोंधळ केला. रिजिजू म्हणाले नीटपेपरलिक वर चर्चेसाठी सरकार तयार आहे. त्यावर खासदार अखिलेश यादव म्हणाले, मुलींचे कपडे फाडणारे तुम्ही? त्यानंतर गोंधळ आणखी वाढला.

टाईम्स स्पेशल

दरम्यान सरकार या मुद्यावर चर्चेस तयार झाले आहे. लोकसभेत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले विद्यार्थ्यांसोबत जे घडले ते लज्जास्पद आहे. विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणले. आंदोलक मुलींचे कपडे फाडले गेले. शिक्षण कोणत्या पक्षाचा मुद्दा नव्हे तर देशाचा मुद्दा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg