रत्नागिरी : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. लेनी डा कोस्टा यांनी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील डिस्ट्रिक्ट ३१७० मधील सर्व रोटरी क्लबांना १ जुलै रोजी एकाच दिवशी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने ‘कर्तव्याचा जागर फेस्ट २०२६-२७’ या वर्षभर चालणाऱ्या सेवा अभियानाचा शुभारंभ भव्य रक्तदान शिबिराने केला. जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध रक्तगटांच्या रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला रत्नागिरीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत रक्तदान केले. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोलाची मदत होणार आहे.
शिबिराचे उद्घाटन अनबॉक्सचे गौरांग आगाशे, इव्हेंट चेअर रितेश सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले. या सामाजिक उपक्रमासाठी दैवज्ञ समाजाचे मोलाचे सहकार्य लाभले. दैवज्ञ भवनचे महेश खेडेकर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिरासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनीष नलावडे यांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, सहकारी संस्था आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. क्लबचे सचिव आनंद चौगुले यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
कर्तव्याचा जागर फेस्ट २०२६-२७’ अंतर्गत आयोजित हे रक्तदान शिबिर रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या सेवाभावी कार्याची दमदार सुरुवात ठरली असून, आगामी काळात आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, कुपोषण निर्मूलन आणि समाजकल्याणाशी संबंधित अनेक लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.