loader
Breaking News
Breaking News
Foto

गुटखा प्रकरणातील संशयित आरोपी फारुक कच्चीला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपी फारुक अल्लारखॉ कच्ची याची चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी (१३ जुलै) त्याला देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मा. न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी आरोपीला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात २६ जून २०२६ रोजी रात्री पारेख पेट्रोल पंपाजवळ एमएच-१४/बीके-४१२० क्रमांकाच्या वॅगनार कारमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळाली होती. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने कार रस्त्याच्याकडेला लॉक करून घटनास्थळावरून पलायन केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता सुमारे ₹५ लाख ४६ हजार ६०० किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान जप्त वाहनाचा मालक फारुक अल्लारखॉ कच्ची आणि मोहम्मद यासिन उमर फारुक पठाण हे संगनमताने प्रतिबंधित गुटख्याची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले होते. दीड महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या फारुक कच्ची याला संगमेश्वर पोलिसांनी ९ जुलै रोजी चिपळूण येथे सापळा रचून अटक केली होती.

टाईम्स स्पेशल

चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मोहम्मद यासिन उमर फारुक पठाण याचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या देखरेखीखाली पोहेकॉ मनवल व पोलीस कॉन्स्टेबल आटोळे यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg