loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत सहकार ध्वजारोहणाने आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चिटणीस बिल्डिंग-माठेवाडा येथील फेडरेशनच्या कार्यालयात सहकार ध्वज फडकवून या दिनाचे औचित्य साधण्यात आले. ​जगभरात आंतरराष्ट्रीय सहकार दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात असताना, सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशननेही या चळवळीला गती देण्याच्या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, तज्ज्ञ संचालक रमेश बोंद्रे, अॅड. समीर वंजारी, व्यवस्थापक महेश्वर कुंभार तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक किशोर रावराणे प्रामुख्याने उपस्थित होते. ​यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व संस्थांनी सहकार चळवळीचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे.

टाईम्स स्पेशल

सहकाराबाबत समाजात अधिक जागृती निर्माण करून ही चळवळ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. या महत्त्वपूर्ण चळवळीचा विस्तार करण्यासाठी सहकारातील कार्यकर्त्यांनी आणि संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी समाजातील प्रत्येक घटकांशी थेट संवाद साधला पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला या सहकार चळवळीमध्ये सामील करून घेण्याचा निश्चय आपण सर्वांनी करावा, असे आवाहनही राऊळ यांनी यावेळी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg