loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येणार, उद्या सामंजस्य करार होणार... पालकमंत्री सामंतांचे प्रयत्न

रत्नागिरी : रत्नागिरीकरांचे गेल्या अनेक वर्षांचे विमान प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येण्याची सुवर्णघडी समीप आली आहे. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रत्नागिरी विमानतळाचा विकास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या दिवाळीनंतर रत्नागिरीकरांना मुंबई गाठण्यासाठी विमानाचा जलद, सोयीस्कर आणि सुखकर पर्याय उपलब्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या विमानतळाच्या कामाला २ जानेवारी २०२५ रोजी सुरुवात झाली असून, केवळ १०० कोटी रुपयांच्या खर्चात २५ एकर जागेवर हे अद्ययावत विमानतळ उभे राहत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे तब्बल ८० टक्के काम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्य रस्त्यापासून टर्मिनल बिल्डिंगपर्यंतचा १७०० मीटरचा रस्ता आणि धावपट्टी ते टर्मिनल दरम्यानचे ३२७ मीटरचे काम पूर्ण झाले असून, केवळ मुख्य रस्त्याचे किरकोळ काम आणि पार्किंगचे मार्किंग करणे शिल्लक आहे. या विमानतळावरून ७२ आसनी विमाने उडू शकणार असून एकाच वेळी ४ विमाने पार्क करण्याची क्षमता येथे असेल. व्यावसायिक उड्डाणांसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्ट गार्ड) धावपट्टीचा वापर केला जाणार असून, उर्वरित सर्व ऑपरेशन्स तटरक्षक दलाच्या संरक्षण भिंतीबाहेर पार पडणार आहेत.

टाईम्स स्पेशल

या संदर्भात रविवारी ५ जुलै रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (चअॄउ) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार होणार आहे.ङ्गङ्घरत्नागिरी ते मुंबई प्रवासासाठी सध्या ’अलायन्स एअरलाईन’ कंपनीसोबत बोलणी सुरू आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करून ’डीजीसीए’ची (ॄॠउअ) अधिकृत परवानगी मिळताच रत्नागिरीच्या आकाशात विमाने घोंगावू लागतील. पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार होत असून कोकणच्या विकासाला यामुळे मोठी गती मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg