loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाचे आगमन होताच बळीराजाची लगबग: शेतात भात लावणीला वेग

गुहागर - नरवण ( सचिन कुळये) : तवसाळ गुहागर तालुक्यातील नरवण गावच्या मोरे परिवार यांनी ( गोरखनाथ - बियाने ) एक कांडी शेतीची गेल ३ वर्षा पासून पिक घेत आहेत. आधुनिक पद्धतीने शेती करत शेती शिवाय पर्याय नाही हि व्रत पाळण करत शेतीसाठी गुंतुन गेले आहेत.जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे, कोकणासह राज्यातील ग्रामीण भागातील शेतीकामांनी वेग घेतला आहे. सध्या शेतकरी बांधव आणि महिला मोठ्या उत्साहात भात लावणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाऊस पडताच शेतात पाणी साचले असून, ही वेळ भात रोपांची लावणी करण्यासाठी सर्वात पोषक मानली जाते. पुरुष ,महिला शेतकरी पावसापासून बचावासाठी रेनकोट व प्लास्टिक पेपर परिधान करून, अतिशय मेहनतीने चिखलात उभे राहून भाताची रोपे लावत आहेत. बळीराजा पावसाच्या पाण्यावर या कष्टावरच पिकाचे भविष्य अवलंबून असते.यंदा वेळेवर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जर असाच पाऊस सुरू राहिला तर यंदा भाताचे विक्रमी उत्पन्न मिळण्याची आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. पेरणीनंतर आता लावणीच्या कामांना वेग आल्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे जोमाने सुरू झाली आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg