loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रस्तावित बारसू अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात राजापूर पंचायत समितीमध्ये एकमुखाने ठराव

राजापूर, (वार्ताहर) : शासनाने राजापुरातील बारसू-सोलगाव येथे अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा सामंजस्य करार केल्याच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकल्पाला स्थानिक जनतेने तीव्र विरोध दर्शविला आहे. स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला विरोध असल्याने हा प्रकल्प उभारू नये, शासनाने जनभावनांचा आदर करावा अशा आशयाचा एक ठराव राजापूर पंचायत समितीच्या सभेत एकमुखाने मंजूर केला. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवन येथे सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपसभापती अभिजीत गुरव, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, शिवसेनेचे गटनेते उमेश पराडकर, प्रतोद प्रसाद मोहरकर, पंचायत समिती सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दाही सभेत गाजला. ओणी-अणूस्कुरा मार्गावरील मोठमोठ्या खड्‌ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत असल्याचे सदस्य उमेश पराडकर आणि अपेक्षा मासये यांनी निदर्शनास आणून दिले. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीस सुरक्षित बनविण्याची मागणी त्यांनी केली.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, प्रस्तावित बारसू-सोलगाव अणुुऊर्जा प्रकल्पाच्या विषयावर झालेल्या चर्चेत सर्व सदस्यांनी एकमताने प्रकल्पाला विरोध दर्शवित ठराव मंजूर केला. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प मंजूर करू नये, अशी भूमिका सभेत नोंदविण्यात आली. विकासकामांतील त्रुटी, विविध विभागांच्या कामकाजातील उणिवा आणि जनतेच्या प्रश्नांवर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राजापूर पंचायत समितीची मासिक सभा विविध मुद्द्यांवरील चर्चेमुळे गाजली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg