वेळणेश्वर (उमेश शिंदे) : श्री देव महापुरुष भजन मंडळ, पूर्णगड रत्नागिरी यांच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, रत्नागिरी येथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले श्री पांडुरंग महादेव मिरजुळकर यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात खारवी समाज भवन रत्नागिरी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांचे कट्टर समर्थक व जिल्हा परिषद सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप, लांजा पंचायत समिती सदस्य यशवंत वाकडे, गावडे आंबेरे गावचे सरपंच लक्ष्मण सारंग, खारवी समाज पतसंस्था उपाध्यक्ष सुधीर वासावे, जेष्ठ समाजसेवा मनोहर भिडे, जेष्ठ सदस्य, भरत नाटेकर, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन तसेच माऊली महिला नमन मंडळाने सुमधुर व लयबध्द तालात ईशस्तवन स्वागतगीत सादर करुन केली. संगीतसाथ नारायणबुवा मिरजुळकर व संदिप आंबेरकर यांनी दिली होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदन डोर्लेकर गुरुजी यांनी केले. आपल्या प्रेरणादायी मनोगतात "एक आदर्श बाप म्हणजे पांडुरंग मिरजुळकर" आहेत त्यांच्या कर्तृत्वाचा, कुटुंबवत्सल स्वभावाचा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. पांडुरंग मिरजुळकर यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये अनेक वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावली. शासकीय सेवेत असताना त्यांनी आपले कर्तव्य पार पाडतानाच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला योग्य संस्कार, शिक्षण आणि मूल्यांची शिकवण दिली. त्यामुळे ते केवळ एक जबाबदार कर्मचारीच नव्हे, तर समाजासाठी प्रेरणादायी आदर्श पिता म्हणूनही ओळखले जातात असे गौरवोद्गगार म्हाप यानी काढले. यावेळी महापुरुष भजन मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांच्या सेवाभावी कार्याचा, साधेपणाचा आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत त्यांच्या निरोगी, आनंदी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांची मुलगी सौ प्रथमा पटेकर, वामन डोर्लेकर, अनुष्का जाधव यांनीही भावनाविवेश होवून मनोगते व्यक्त केली.
या सन्मान सोहळ्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री देव महापुरुष भजन मंडळाने उत्कृष्टरीत्या केले असून, हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, असा भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष तारये, दिनेश डोर्लेकर, शैलेश आंबेरकर, वामन डोर्लेकर, विजय डावखुरे, मनोहर डोर्लेकर, रत्नदिप डोर्लेकर, रविंद्र डोर्लेकर, महेश डोर्लेकर, रगेश लाकडे, हरेश लाकडे, हितेश आडविरकर, विजय आडविरकर, मुरलीधर नाटेकर आदीनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वासुदेव वाघे यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.