loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरे येथे श्री रामेश्वर वाचन मंदिर यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम

मालवण (प्रतिनिधी) - प्रत्येक वृक्षातील औषधी गुणधर्म मानवाच्या जीवनात उपयोगी ठरत आसतात.मात्र याबाबत योग्य ती माहिती मिळाल्यास प्रत्येक वृक्षाचे जतन होऊन पर्यावरण संवर्धन होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी कृषीविषयक पुस्यकांचे वाचन प्रत्येकाने करणे आवश्यक असल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आचरे येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आचरा तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी,संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, वैशाली सांबारी, भिकाजी कदम, वनराई संस्थेच्या गौरी मायनाक, शिवराम म्हापणकर, तसेच मांगिरीष सांबारी, रामेश्वर वाचन मंदिर सांस्कृतिक समिती सदस्य श्रद्धा महाजनी, ग्रंथपाल विनिता कांबळी, महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी बोलताना सुरेश ठाकूर यांनी रामेश्वर वाचन मंदिरात उपलब्ध असलेल्या ५०० च्यावर कृषी विषयक पुस्तकांमधील दहा पुस्तकांबाबत अत्यंत महत्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. यावेळी वनराई आणि एचडीएफशी परीवर्तन संस्थेच्या गौरी मायनाक यांनी गावागावात कृषी साक्षरता आणि उद्योग साक्षरता निर्माण करण्यासाठी आमची संस्था कार्यरत असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg