loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मंदिर येथेे 19 जुलै रोजी वृंदा फडके यांचे व्याख्यान

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, अध्यात्म मंदिर रत्नागिरी येथे रविवार दि. 19 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.45 ते 7.15 यावेळेत वृंदा फडके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर ते स्वामी स्वरूपानंद गुरु परंपरा या विषयावर हे व्याख्यान होईल. वृंदा फडके यांना लहानपणापासून अध्यात्मिक आवड आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध शिवाय अनेक स्तोत्रांचा त्यांचा अभ्यास आहे. भगवद्गीता आणि वक्तृत्व यामध्ये अनेक पारितोषिके मिळाली आहेत. योगासन, सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कीर्तनाची लहानपणापासून गोडी. दादर कीर्तन संस्थेतर्फे नारदीय कीर्तनाचा अभ्यास केला. महेशबुवा काणे, वालोपे हे त्यांचे कीर्तनातील गुरु आहेत. नोकरी सांभाळून आत्तापर्यंत 135 कीर्तने व प्रवचने झाली आहेत. कृपया या व्याख्यानाला आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg