loader
Breaking News
Breaking News
Foto

पुजारेवाडी युवकांकडून श्रमदानातून अंतर्गत रस्त्याची सफाई

मालवण (प्रतिनिधी) - आचरा बाजारपेठ ते आचरा तिठा कावळे दुकानाकडे जाणार्‍या अंतर्गत रस्त्याची पुजारेवाडी येथील युवकांनी श्रमदानातून स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. आठवडा बाजार तसेच इतर दिवशी बाजारपेठ, देवूळवाडी आणि परिसरातील नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, झुडपे आणि वेली वाढल्याने वाहनचालक व पादचार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच सरपटणार्‍या प्राण्यांचा धोका निर्माण झाल्याने हा रस्ता धोकादायक बनला होता. ही समस्या लक्षात घेऊन पुजारेवाडीतील युवकांनी पुढाकार घेत श्रमदानातून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झुडपे व वेली हटवून रस्ता स्वच्छ केला. या उपक्रमामुळे रस्ता वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित झाला असून नागरिकांनी युवकांच्या सामाजिक जाणिवेचे आणि कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg