loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम मंदिर लुटीविरोधात पनवेलमध्ये ‌‘रामदूत महाआरती'चे आयोजन

पनवेल :- अयोध्येतील श्रीराम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पनवेल येथे ‌‘रामदूत महाआरती' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला असून, मोठ्या संख्येने रामभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पनवेल येथील हनुमान मंदिर, लाईन आळी येथे होणाऱ्या या कार्यक्रमातून श्रीराम मंदिराशी संबंधित कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात आवाज उठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमात धार्मिक वातावरणात महाआरती करण्यात येणार असून, रामभक्तांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून जिल्हाप्रमुख दीपक निकम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विचारांनुसार हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.

टाईम्स स्पेशल

“रामद्रोह, हिंदुद्रोह म्हणजेच देशद्रोह” हा संदेश देत श्रीराम मंदिराच्या सन्मानासाठी आणि हिंदू समाजाच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. पनवेल व परिसरातील नागरिकांनी या महाआरतीत सहभागी व्हावे, असे आवाहन शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg