खेड (दिलीप देवळेकर) - शिवसेना नेते रामदासभाई कदम व गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख दर्शन महाजन यांच्यावतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी तसेच पूरग्रस्त भागात काम केलेले कर्मचारी तसेच स्वयंसेवक यांच्याकरिता आयोजित करण्यात आलेला मोफत टी.टी. इंजेक्शन उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. जवळपास ११५० नागरिकांनी याचा लाभ घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे अनेकाना जखमा, संसर्ग आणि आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असताना, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे आणि संभाव्य धोके टाळता यावेत, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला. सदरवेळी डॉक्टर विक्रांत पाटील व त्यांची टीम उपस्थित होती.
या उपक्रमाचा लाभ पूरग्रस्त नागरिकांसह खेड नगरपरिषदेतील स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, पूरग्रस्त भागात अहोरात्र कार्यरत स्वयंसेवक आणि मदतकार्य करणाऱ्या अनेकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. नागरिकांनी दाखविलेला विश्वास आणि सहभाग हेच या उपक्रमाच्या यशाचे खरे बळ ठरले. संकटाच्या काळात केवळ शब्दांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जनतेच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी समाजसेवा आहे. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत शिवसेना युवासेना खंबीरपणे त्यांच्या सोबत उभी असते आणि पुढेही जनतेच्या सेवेसाठी अशाच लोकहिताच्या उपक्रमांची अखंड परंपरा सुरू राहील.
सदर वेळी शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते , नगराध्यक्ष माधवीताई बुटाला शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, सभापती तौसीफ खोत, रसिका खेडेकर, भूषण चिखले, यश खेडेकर, नगरसेवक प्रेमल चिखले, संजना कुडाळकर आरिफ मुल्लाजी, स्वप्निल सैतवडेकर, युवासेना उपतालुका प्रमुख वाहिद ममतुले, युवासेना शहरप्रमुख मयुरेश दरेकर, युवासेना माजी शहरप्रमुख सिद्धेश खेडेकर, राकेश सागवेकर, सरफराज पांगारकर, माजी नगरसेवक अजय माने, आनंद घोले, राजू आंब्रे, साईराज खेडेकर, विनायक माने, साहिल बुटाला, कौशल जाड़कर, संतोष शिन्दे, सुनील साळुंखे, श्रेयस ढगे, यश साळवी, मधुर चिखले तसेच शिवसेना, युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.