सावंतवाडी, (प्रतिनिधी): ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांनी पुढील चार आठवड्यांसाठी विस्तारित श्रेणीतील पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, पहिल्या आठवड्यात कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पावसाचा अंदाज पाहता पहिल्या आठवड्यात म्हणजेच १६ ते २३ जुलै दरम्यान कोकणातील सर्व जिल्ह्यांत दररोज १० ते २० मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, हे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असेल. उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी कमी, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तो सरासरीपेक्षा १५ टक्क्यांहून अधिक कमी राहण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच २३ ते ३० जुलै दरम्यान पाऊस वाढणार असून कोकणातील सर्व जिल्ह्यांत दररोज २० ते ४० मिमी पाऊस पडू शकतो, जो सरासरीपेक्षा ४ ते ७ टक्क्यांनी जास्त असेल. पहिल्या आठवड्यातील पावसाची ओढ लक्षात घेता, नुकतीच पुनर्लागवड झालेल्या भात पिकाचे नुकसान टाळण्यासाठी मुळदे कृषी केंद्राने आपत्कालीन उपाययोजना सुचवल्या आहेत. पाऊस नसल्याने भात खाचरे कोरडी पडून नांग्या पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी नदी, नाले, ओढे किंवा विंधन विहिरींच्या माध्यमातून खाचरांमध्ये २.५ ते ५ सेमी पाणी पातळी राखावी. तसेच, पडणारा पाऊस साठवण्यासाठी खाचरांची बांधबंदिस्ती करावी.
पाण्याच्या ताणामुळे पिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी आणि रोपे व्यवस्थित रुजण्यासाठी १० ग्रॅम पोटॅशिअम क्लोराईड प्रति १ लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या सुरुवातीच्या काळात फवारणी करावी. कोवळ्या पानांतील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी ३० ग्रॅम केओलिन चिकणमाती प्रति १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, ज्यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन पाण्याचा ताण कमी होईल. सध्याच्या कोरड्या कालावधीत कोणतेही तणनाशक वापरू नये, कारण यामुळे रोपांना इजा होऊ शकते. रोपे व्यवस्थित रुजल्यावर यांत्रिक पद्धतीने रोटरी विडरचा वापर करून तण नियंत्रण करावे. जमिनीतील ओल टिकवून ठेवण्यासाठी आणि बाष्पीभवन कमी करण्यासाठी भात पिकाच्या ओळींमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले सेंद्रिय आच्छादन वापरावे, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांनी केले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.