वैभववाडी(प्रतिनिधी)- तालुक्यातील खांबाळे ग्रामपंचायत हद्दीतील महसूल गाव मोहितेवाडी (खालचीवाडी) येथील ओढ्यावरील लोखंडी साकव मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र चार गुरे जखमी झाली. मौजे मोहितेवाडी येथील संजय गोविंद पवार हे स्वतःच्या मालकीची सहा गुरे चराईसाठी घेऊन ओढ्यावरील लोखंडी साकवावरून जात असताना साकव अचानक कोसळला. त्यामुळे गुरे साकवामध्ये अडकली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून अडकलेल्या गुरांची सुरक्षित सुटका केली. या घटनेत चार गुरांना दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी घटनास्थळी भेट देऊन साकवाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक प्राजक्ता कदम, माजी सरपंच गणेश पवार तसेच विक्रांत पवार उपस्थित होते. घटनेत जखमी झालेल्या चार गुरांवर आचिर्णे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पर्यवेक्षक डॉ. हेदुळकर यांनी गुरांच्या मालकाच्या घरी जाऊन उपचार केले. दरम्यान, तलाठी केदारी बागल यांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधितांचे जबाब नोंदविले व अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला. यावेळी पोलीस पाटील अस्मिता चव्हाण आणि कोतवाल संतोष काळे उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.