loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती रॅली

दापोली (वार्ताहर) : कृषी महाविद्यालय, दापोलीच्या संजीवनी विद्यार्थीनी समूहातर्फे कृषी दिनानिमित्त शिवाजीनगर, साखळोली येथे विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील सभागृहात महिलांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषी दिनाचे महत्त्व, वसंतराव नाईक यांच्या कार्याचा परिचय तसेच शेतीचे राष्ट्राच्या विकासातील योगदान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर गावातून कृषी व पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांची पारंपरिक वेशभूषा साकारून कृषी संस्कृतीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गावदेवी मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg