loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; २४ तासांत सरासरी ३०४.१४ मिमी पावसाची नोंद

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, सरासरी ३०४.१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागांत सखल परिसर जलमय झाला असून, घरांमध्ये पाणी शिरणे, रस्ते जलमय होणे आणि जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात पालगड येथे सर्वाधिक ३८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर दापोली ३३३ मिमी, वाकवली ३२४ मिमी, वेळवी ३०९ मिमी, दाभोळ २९९ मिमी, आंजर्ले २८५ मिमी आणि बुरोंडी १९६ मिमी पावसाची नोंद झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या आकडेवारीनुसार, दापोली तालुक्यातील सातही महसूल मंडळांमध्ये एकूण २,१२९ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे १ जूनपासून आजपर्यंत तालुक्याची एकूण सरासरी पर्जन्यमान १,३१९.३३ मिमी इतके झाले असून, मागील सरासरी १,०१५.१९ मिमीच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी नदी-नाले, सखल भाग आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. माथेगुजर येथील मोहन संभाजी पवार यांच्या गोठ्याचे 27 पत्रे उडून गेले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg