म्हसळा - रायगड : राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार बुधवार दि.२२ जुलै २०२६ रोजी राज्यभरात अजितदादा पवार यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये ,शाळा व अंगणवाडी केंद्रांना अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रतिमांचे वितरण करण्यात आले.
शासनाच्या सूचनेनुसार जयंतीदिनी संबंधित कार्यालये, शाळा व अंगणवाड्यांमध्ये प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, महिला तालुकाध्यक्ष मीना टिंगरे, सभापती बबन मनवे, उपसभापती लहू म्हात्रे, जि.प. सदस्य अभिषेक विचारे, जि.प. सदस्य अनिल बसवत, नगराध्यक्ष सुनील शेडगे, नगरसेविका जयश्री कापरे, गणाध्यक्ष सतीश शिगवण, मोरेश्वर पाटील, नाना सावंत, किरण पालांडे, गजानन पाखड, मंगेश म्हशीलकर, सोहेल, प्रकाश गाणेकर, माळी, किशोर मोहिते, दिलीप शिंदे यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी, शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत करत, समाजाप्रती कार्य करणाऱ्या नेतृत्वाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.