मुंबई - राज्यात सध्या सत्ताधारी पक्षाचे लोक अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून त्यांना कोणालाही मारण्याचे आणि कुठेही कायदा हातात घेण्याचे जणू 'लायसन्स'च मिळाले आहे. तुम्ही काहीही करा, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशाच अविर्भावात सत्ताधारी पक्षाचे वर्तन सुरू आहे, अशा तीव्र शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एका शिवसेना नगरसेवकाने महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा रक्षकांना केलेल्या मारहाणीचा जाधव यांनी तीव्र निषेध केला. राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला.
भास्कर जाधव म्हणाले की, केंद्रात आणि देशभरातील 22 राज्यामध्ये ज्यांचे सरकार आहे ही सरकारं येण्याकरता ज्या ज्या पक्षाने आणि नेत्यांनी मदत केली केली त्यांना संपवण्याचे काम दिल्लीतील आणि राज्यातील राज्यकर्त्यांनी केले आहे. ज्या प्रभु श्रीरामाच्या कृपेने हे सरकार सत्तेवर आले त्या प्रभु श्रीरामचंद्राच्या मंदिरात यांनी चोरी करण्यास मागे पुढे भास्कर जाधव म्हणाले की, प्रभु श्रीरामांचे मंदिर व्हावे म्हणून जनतेने देणगी दिली ती चोरण्याचे काम या लोकांनी केले आहे. त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षा झाली पाहिजे. हिंदुत्व मानणाऱ्या लोकांना एकत्र घेत आम्ही महाराष्ट्रभरात आंदोलन करणार आहोत. राज्यातील मंत्री अनेक घोटाळे करत आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार होत आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, लोकं बेजबाबदारपणे वागत आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. तर काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे तर काही भागात पाऊस अतिशय कमी झाला आहे, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. एसआयआरच्या मार्फत मतचोरी होऊ शकते त्याकडे लक्ष दिले पाहिजे असेही जाधव यांनी म्हटले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.