loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे एस. ‌टी. स्टॅड समोरून जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था; वाहतूक झाली धोक्याची

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुका मुख्यालयाकडून हर्णे - पाजपंढरी आंजर्लेकडे जाणारा रस्ता हा हर्णे एस. टी. स्टॅड कडून पुढे पाजपंढरी मार्गे आंजर्लेकडे जातो. अशा या हर्णे गावातून जाणाऱ्या मार्गाच्या मुख्य रस्त्यावरूनच रस्ता खोदाई करुन विदयुत महावितरणची भुमिगत लाईनची केबल टाकण्याचे काम सुरू आहे. ही भुमिगत विद्युत लाईनची केबल टाकण्यासाठी हर्णे एस. टी. स्टॅड समोरील मुख्य रस्ता अगदी मधोमध खोदण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे सगळीकडेच पावसाची कोसळधार सुरू आहे. त्याला हर्णे गाव सुध्दा अपवाद नाही. अशा या पावसाच्या पडणाऱ्या कोसळधारेने भुमीगत विद्युत लाईनची केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यातील खड्ड्यातील माती पावसाच्या पाण्याने पार वाहून गेल्याने खोदलेल्या चरात पावसाचे गढुळ पाणी साचून राहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे.

टाईम्स स्पेशल

हर्णे गावातून जाणा-या या मार्गावरील सर्व प्रकारच्या सुरळीत वाहतुकीला बाधा येवू नये, यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने या गंभीर गोष्टीचा विचार करून शक्य तितक्या लवकर दुरवस्था झालेल्या रस्त्याची तातडीने सुधारणा करण्यात येवून रस्ता वाहतूक योग्य करावा अशाप्रकारच्या मागणीने जोर धरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg