लांजा (वार्ताहर) - तालुक्यातील हर्चे येथील पोस्ट ऑफिसच्या शाखा डाकघरात ८ लाख २० हजार १५२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखा डाकपाल जयप्रकाश यशवंत पवार याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद समीर सूर्यकांत बेल्हेकर, (३६ वर्षे, डाकघर निरीक्षक, लांजा उपविभाग लांजा, रा. लांजा वैभव वसाहत) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे.
हर्चे येथील शाखा डाकघरात कार्यरत असताना जयप्रकाश यशवंत पवार (५१ वर्षे, रा. हर्चे, बौद्धवाडी) यांनी पोस्टाचे खाते उघडण्यासाठी ग्राहकांकडून स्वीकारलेली रक्कम सरकारी दस्तऐवजात नोंदवली नाही. दि. २९ जुलै २०१३ ते दि. २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत त्याने ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ८,२०,१५२ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये ५,३०,१५२ रुपये ही कायमस्वरूपी रक्कम, तर २,९०,००० रुपये ही तात्पुरती रक्कम असा एकूण ८,२०,१५२ रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे.
याप्रकरणी दि. १३ जुलै २०२६ रोजी रात्री २१.१९ वाजता लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले हे करत आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.