loader
Breaking News
Breaking News
Foto

जाखडी, नमनाप्रमाणे भजनालाही राजाश्रय मिळावा : पालकमंत्री सामंत

रत्नागिरी, 15 जुलै (वार्ताहर) ः राजकारणात हल्ली राजकीय नटवे भरपूर झालेले आहेत मात्र लोककलेतून आपल्याला परंपरा जपायची आहे. ज्याप्रमाणे जाकडी नमन यांना राजाश्रय मिळाला आहे. त्याचप्रमाणे भजन मंडळाचादेखील त्यामध्ये समावेश व्हावा अशी मागणी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केली. ते नमन व जाकडी मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. आशिष शेलार, आ. किरण सामंत, आ. प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके,े नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे , भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, राजेंद्र महाडिक आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना पालकमंत्री ना. उदय सामंत पुढे म्हणाले की अनेक नमन आणि भजन मंडळांची अद्याप नोंदणी (रजिस्ट्रेशन) झालेली नसल्याने या प्रश्नावर मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उद्योग व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी त्यांनी भजनालाही लोककलेचा दर्जा मिळावा, अशी मागणी मंत्री ना. आशिष शेलार यांच्याकडे केली. लोककला ही समाजातील जनजागृतीचे प्रभावी माध्यम असून लोकांच्या मनातील ही भावना आशिष शेलार यांनी मान्य केल्याचे सामंत यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg