संगमेश्वर (सत्यवान विचारे/ मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील निकालानंतरही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षफूट होणार, मोठे नेते पक्ष सोडणार अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. या अफवा सत्ताधार्यांच्या अप्रत्यक्ष पाठबळाने काही माध्यमांमधून पेरल्या जात असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख विनोद (बाबू) पवार यांनी केला आहे. राज्यात पक्षफुटीनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विरोधकांनी प्रचंड धनशक्ती आणि यंत्रणेचा वापर करूनही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
त्यामुळे झालेल्या पराभवाची सल त्यांच्या मनात असून त्यातूनच पक्षफुटीच्या वावड्या उठवल्या जात आहेत, असे पवार यांनी म्हटले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री रवींद्र माने तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हा संघटक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कडवई जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले. अनेक बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पक्षाच्या उमेदवारांनी विजय संपादन केला. याच यशामुळे विरोधक अस्वस्थ झाले असून भविष्यात पक्षात सक्षम नेतृत्व उभे राहत असल्याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळेच मोठे नेते पक्ष सोडणार किंवा पक्ष फुटणार अशा अफवा मुद्दाम पसरवल्या जात आहेत, असा दावा पवार यांनी केला.
२०२९ चा आमदार संगमेश्वर तालुक्याचाच असेल आणि तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात किंवा जिल्ह्यात सत्ता नसतानाही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांमधील विश्वास, जनतेशी असलेली नाळ, विकासकामे आणि अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी शिवसेना हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांची स्वप्ने पूर्ण होणार नाहीत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोणताही धक्का बसणार नाही. राजकारण हा केवळ व्यवसाय मानणारे काही जण पक्ष सोडून गेले असले तरी त्याची ना खंत आहे ना चिंता. शिवसेना आजही अभेद्य आहे आणि भविष्यातही अभेद्य राहील, असा विश्वास विनोद (बाबू) पवार यांनी व्यक्त केला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.