loader
Breaking News
Breaking News
Foto

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 40 वर्षीय संशयिताविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा

दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी 40 वर्षीय व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन (15 वर्षे 7 महिने 24 दिवस )असून संशयित राकेश कृष्णा फणसकर याने जून 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यातून मुलगी गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून दापोली पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 64(2)(M) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम 4, 6 व 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व तो दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा तपास दाभोळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg