मुंबई, (प्रतिनिधी ) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अतुलनीय त्याग आणि ऐतिहासिक संघर्ष ज्या संगमेश्वर येथील कसबा गावात झाला, तिथे आता जागतिक दर्जाचे स्मारक साकारणार आहे. विधानपरिषदेत या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार असल्याची मोठी घोषणा केली. या निर्णयामुळे शिवशंभू भक्तांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कसबा (संगमेश्वर) येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे, ही लोकभावना शुक्रवारी विधान परिषदेत अत्यंत पोटतिडकीने आ. प्रमोद जठार यांनी लक्षवेधी मार्फत मांडण्यात आली. यावर राज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी माहिती दिली की, पहिल्या टप्प्यातील ५ एकर जागेसाठी ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
तसेच, वाढीव जागा मिळाल्यास तीही संपादित केली जाईल. यासोबतच, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ग्वाही दिली की, ’भाग-१’ मधील काम मार्गी लावून ’भाग-२’ अंतर्गत डोंगरावरील अतिरिक्त जागा संपादित करण्याचा प्रस्ताव तातडीने आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे सादर केला जाईल. ज्या सरदेसाई वाड्यात हा इतिहास घडला, तिथेच हे स्मारक उभे राहावे, अशी सर्वांची इच्छा होती. या ऐतिहासिक कार्यासाठी सरदेसाई कुटुंबीयांनी अत्यंत मोलाचे योगदान देत स्मारकासाठी ४ एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. स्थानिक नेते, मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या सामूहिक प्रयत्नांतून या स्मारकाची पायाभरणी आता निश्चित झाली असून, एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात होत आहे.
या स्मारकाच्या जागेवरून स्थानिक पातळीवर सामाजिक एकतेचे मोठे उदाहरण पाहायला मिळाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या परिसराला भेट दिली असता, जागा द्यायला कोण तयार आहे? अशी विचारणा केली होती. त्यावेळी केवळ हिंदू बांधवांनीच नव्हे, तर स्थानिक मुस्लिम बांधवांनीही स्वतःचे सातबारे पुढे करत, आमची जागा घ्या, पण इथे ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’ प्रमाणे जगाला हेवा वाटेल असा ’स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस’ उभारा! अशी एकमुखी मागणी केली होती. ही बाब महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेची आणि शिवशंभूंच्या विचारांची ताकद अधोरेखित करणारी ठरली आहे. संगमेश्वर येथे उभारला जाणारा हा ’स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस’ केवळ एक वास्तू नसून, तो येणार्या अनेक पिढ्यांना शंभूराजांचे शौर्य, स्वराज्यनिष्ठा आणि बलिदानाची निरंतर प्रेरणा देत राहील, असा विश्वास या निमित्ताने राज्यमंत्री ना. योगेश कदम व आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.