मुंबई : राजकीय घडामोडीचे वादळ उठेल तेव्हा कळेलच पण आता राजकारणात पुन्हा एकदा नेतृत्वबदलाच्या सुरु झाल्या आहेत . काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे चर्चांना प्रारंभ झालाय .पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात नेऊन, भाजपात (शिवसेनेचे) विलिनीकरण करून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चा मी ऐकल्या आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांनी या चर्चांबाबत स्वतःच साशंकता व्यक्त केली. चव्हाण म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणायचं, अशी चर्चा मला खरी वाटत नाही. कारण शेवटी तिथे कोणाला नेमायचं, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी ऐकीव चर्चेचा उल्लेख केला असला, तरी त्या प्रत्यक्षात घडतीलच, असा दावा त्यांनी केलेला नाही.
यावेळी त्यांनी राज्यातील सत्तासमीकरणांवरही भाष्य केले. पक्षांतील फोडाफोड, आमदारांचे स्थलांतर आणि त्यामागील राजकीय कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अशा घडामोडी वैचारिक भूमिकेपेक्षा सत्तेच्या राजकारणातून घडत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत आणि सरकारच्या धोरणांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील संभाव्य नेतृत्वबदल, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रातील भूमिका आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या संदर्भात भाजप किंवा शिंदे गटाकडून कोणतीही अधिकृत माहिती बाहेर आली नाही.
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला आहे की, शरद पवार यांच्या पक्षातील ५ ते ६ खासदार अस्वस्थ असून ते पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जसा धक्का बसला होता, तशीच अवस्था शरद पवारांच्या पक्षाची होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.