loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्त्यात रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा; गुन्हा दाखल, खेड बाजारपेठेतील कारवाई

खेड (प्रतिनिधी) - खेड शहरातील बाजारपेठ परिसरात सार्वजनिक रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नारायण चव्हाण (वय ५४, रा. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (१ जुलै) सकाळी सुमारे ११.१५ वाजता खेड बाजारपेठेतील कल्याणी स्टोअर्सजवळील गांधी चौक परिसरात संशियताने आपल्या ताब्यातील (एमएच-०८-ईयू-३६३८) क्रमांकाची अँपे अल्टो रिक्षा सार्वजनिक रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला. तसेच वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा - दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg