loader
Breaking News
Breaking News
Foto

सोवेलीत गुरांचा गोठा झाला जमिनदोस्त; गोठयात बांधलेली ३ जनावरे दगावली

दापोली (प्रतिनिधी) : सतत कोसळत असलेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे सोवेली येथील एका शेतकऱ्याचा गुरांचा गोठा पुर्णपणे जमिनदोस्त झाला असून गोठ्यात बांधलेल्या ४ गुरांपैकी ३ गुरे दगावण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दापोलीत कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यात सगळीकडेच नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. काहींचे पंचनामे होवून त्याची नोंदही झाली आहे तर काहींच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे अजूनही नुकसानीचा अंदाज समजलेला नाही. मात्र दापोली तालुक्यातील सोवेली येथील सुतारवाडी येथे राहणाऱ्या आणि शेतकरी असलेल्या अनंत सोविलकर या गरीब होतकरू शेतकऱ्याने नेहमीप्रमाणे सायंकाळी आपल्या मालकीच्या गुरांच्या सुस्थितीतील गोठ्यात २ गायी, १ बैल आणि एक वासरू अशी एकूण ४ गुरे बांधून ठेवली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाचे दिवस असल्याने मच्छरपासून त्यांचे संरक्षण म्हणून सांयकाळी धुरी करून गुरांचे मालक आपल्या घरी गेले. पावसाची संततधार सुरुच होती सकाळी शेतीकामला जाण्यासाठी ते सकाळी उठणारच होते. मात्र त्याआधीच पाहाटे गोठा कोसळल्याने गुरांच्या हंबरडयाचा जोरदार आवाज आला. ते पाहतात ते गुरांचा गोठा पुर्णपणे जमिनदोस्त झाल्याचे त्या रात्रीच्या अंधारात आणि पावसाच्या संततधारेत त्यांना दिसून आले. त्यांनी सुतारवाडीतील काही रहिवाशांना उठवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. तत्काळ सुतारवाडीतील रहिवासी तसेच पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे पवार, सरपंच जयेश मानकर, पोलिस पाटील महमद पावसकर आदी मदतीसाठी धावून आले. मात्र पूर्णपणे गोठाच जमिनदोस्त झाल्याने आणि काळोखामुळे मदतीत अडथळा येत होता. पण हळूहळू हळू उजाडले आणि मदत कार्याने जोर घेतला.

टाईम्स स्पेशल

गुरांच्या अंगावर पडलेली भाले वासिक आणि गोठ्यातील वैरण बाजुला करून गुरांना बाहेर काढले मात्र त्यात २ गायी आणि एक बैल मृत्युमुखी पडले होते. मात्र या चार गुरांपैकी एक छोटे वासरू सुदैवाने यातून बचावले असले तरी त्याला गंभीर इजा झाल्याने ते सुस्थितीत होवून पुन्हा आपल्या पायावर उभे राहील अशी परिस्थिती नाही. अशा या घटनेने गरीब शेतकऱ्यावर ऐन खरीप हंगामात मोठयाच आपत्तीच्या संकटाने पुरते घेरले आहे. मुलाप्रमाणे लळा लावून ढोरांचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला असून या मौन जातीच्या दुःखद घटनेतून अजूनही त्यांचे कुटुंबीय सावरलेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg