दापोली (प्रतिनिधी) : दुपारच्यावेळी घरातील माणसे भोजन करण्यासाठी बसलेली असतानाच कुंभवे येथे एका राहत्या निवासी घरावर झाड कोसळून घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र घरातील रहिवाशांना सुदैवाने कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दापोलीत पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. सगळीकडे पाणी झाल्याने माती भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे तालूक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसानीच्या पडझडीच्या घटना घडत आहेत.
अशाच प्रकारे कुंभवे येथील गणपत राघो पिंपळकर यांचे कुटुंबिय दुपारच्या वेळी घरी भोजन करण्यासाठी बसलेले असतानाच त्यांच्या घरावर एक भलेमोठे आंब्याचे झाड कोसळून घराची पडझड झाली. यामुळे त्यांचे मोठेच आर्थिक नुकसान झाले आहे मात्र त्यांच्या कुटुंबीयांचे सुदैव म्हणून दुपारी घरी भोजनासाठी बसलेल्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.
दरम्यान घडलेल्या घटनेचे वृत्त गावात पसरताच तत्काळ कुंभवे ग्राम पंचायतीचे सरपंच लक्ष्मण झाडेकर, माजी सरपंच शाहीर अनंत मांडवकर, पोलिस पाटील महेंद्र तांबे, रमेश झाडेकर, सचिन काष्टे, धोंडू शिगवण, रामचंद्र शिगवण, महेश दहीवलकर आदिंसह स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केले. या घटनेची माहिती महसूल अधिकारी सुनिल बागुल यांना देण्यात आली. पंचनामा झाल्यानंतरच नुकसानीच्या अंदाजाचा नेमका आकडा समजणार आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.