loader
Breaking News
Breaking News
Foto

चिंचवली गोटलवाडीतील १९ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर; महसूल प्रशासनाकडून निवारा व भोजनाची व्यवस्था

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचवली अंतर्गत गोटलवाडी येथे जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने संभाव्य भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाई करत धोकादायक परिसरातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगांमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून १९ कुटुंबांतील एकूण ४९ सदस्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व नागरिकांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळा, गोटलवाडी (चिंचवली) येथे करण्यात आली असून महसूल प्रशासनाच्या वतीने त्यांच्यासाठी चहा, नाश्ता, जेवण तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भरणे विभागाचे मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख यांनी सांगितले की, परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने तत्काळ दखल घेत धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच परिसरावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पुढील परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

टाईम्स स्पेशल

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील परिस्थितीवर महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg