loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वर गटाची प्रभाग समितीची सभा नेत्रा ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - प्रभाग समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली वेळणेश्वर गटाची प्रभाग समितीची सभा संपन्न झाली. या सभेला संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये गटातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित जनहिताचे प्रश्न, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि इतर विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विविध विभागांच्या अधिकार्‍यांना प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विकासकामांची गुणवत्ता राखून सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर सभेत भर देण्यात आला. या सभेला जि.प.चे पशु व संवर्धन सभापती महेश नाटेकर, प.स. सभापती प्रणव पोळेकर, उप सभापती निलेश सुर्वे, प.स सदस्य संदीप गोरिवले, प.स. सदस्या गोरिवले व इतर पधादिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg