loader
Breaking News
Breaking News
Foto

सृजन सायन्स सेंटरमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

संगमेश्वर (प्रतिनिधी)- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सृजन विज्ञान केंद्र येथे गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर केदारी यांच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमात देवरुख नं. ३ शाळेचे विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कृतिका सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संदीप कांबळे, श्री. शिवाजी पाष्टे गुरुजी तसेच इतर मान्यवर व पाहुण्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या प्रारंभी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व आणि प्रत्येकाने लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना निसर्गाशी नाते जपण्याचे आणि पर्यावरण रक्षणासाठी सदैव पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

यानंतर सर्व उपस्थितांनी "एक व्यक्ती – एक वृक्ष – उज्ज्वल हरित भविष्य" हा संकल्प मनाशी बाळगत वृक्षारोपणाची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर व उपस्थित पाहुण्यांनी सृजन सायन्स सेंटरच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg