सावंतवाडी (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर नेमळे फौजदारवाडी येथे गोवंश सदृश प्राण्याच्या मांसाची बेकायदेशीर वाहतूक करणारी भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली. या अपघातानंतर ६०५ किलो मांस जप्त करण्यात आले असून, संशयित आरोपी चालकाला न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सद्दाम दावलसाब यालवट्टी (वय ३१, रा. बेटिम, नॉर्थ गोवा; मूळ रा. गदग, कर्नाटक) असे पोलीस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी सद्दाम हा निपाणी येथून एर्टिगा गाडी (क्रमांक KA-51-MN-0470) मधून तब्बल ६०५ किलो गोवंश सदृश प्राण्याचे मांस घेऊन राधानगरी मार्गे गोव्याच्या (आरपोरा) दिशेने जात होता.
शुक्रवारी सकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या सुमारास नेमळे फौजदारवाडी येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकाला (डिवायडर) धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्याच्या उजव्या बाजूला सुमारे ५० फूट लांब जाऊन पलटी झाली. कार पलटी होताच त्यातील मांस रस्त्यावर बाहेर पडले आणि हा तस्करीचा प्रकार उघडकीस आला. अपघातानंतर पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, जमादार मनोज राऊत, सावळ, हवालदार अनिल धुरी, सुरेश धोत्रे, सुरेश पाटील, प्रवीण वालावलकर, मंगेश शिंगाडे, महेश निरवडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण भोवर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी क्रेनच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात आणली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष रीतसर पंचनामा करून ६०५ किलो मांस जप्त करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.