loader
Breaking News
Breaking News
Foto

“मला गावा गावात राजकीय कार्यकर्ते नव्हे तर प्रशासकीय अधिकारी घडवायचे आहेत" - निलेश सांबरे

दापोली (प्रतिनिधी) : “ मला गावा गावात राजकीय कार्यकर्ते नव्हे तर प्रशासकीय अधिकारी घडवायचे आहेत, असे मौलिक विचाराचे स्पष्ट आणि सडेतोड मार्गदर्शन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी दापोली येथे समाज बांधवांच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर जिजाऊ सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, सचिव केदार चव्हाण, कुणबी समाजोन्नती संघ, दापोली चे अध्यक्ष रमेश पांगत, जगदिश कलमकर, डॉ.सुनिल गोरीवले, सुर्यकांत म्हसकर, विनिता शिगवण, मंडणगडचे दिनेश सापटे आदिंसह विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर ज्ञाती बांधव उपस्थित होते. दापोली शहरातील पेन्शनर्स असोसिएशनच्या सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ दापोली ने आपल्या ज्ञाती बांधवांसाठी एका समाज मेळाव्याचे आयोजन केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या समाज मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक निलेश सांबरे उपस्थित होते. त्यांनी मेळाव्यात शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी समाजातील जास्तीत जास्त युवक युवतींनी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. “मला गावा गावात राजकीय कार्यकर्ते नव्हे तर प्रशासकीय अधिकारी घडवायचे आहेत,” अशाप्रकारे विश्वास आणि प्रोत्साहन देणारे महत्त्वाचे भाष्य केले. आपल्या तडाखेबंद मार्गदर्शनात शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योग-व्यवसायाच्या संधी आणि आर्थिक स्वावलंबन यावर देखील त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. युवकांनी रोजगाराच्या नवीन संधी शोधून स्वतःबरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. तर आरोग्याच्या विषयावर बोलताना त्यांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, व्यसनमुक्त जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. निरोगी समाज हा प्रगत समाजाचा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ, दापोलीचे अध्यक्ष रमेश पांगत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि तालुका सदस्य जगदीश कलमकर, सुधिर कांबळी, ॲड. मधुकर मोहिते, डॉ. सुनील गोरीवले, मंगेश वारसे, उदय पारदुले, संजय गोरीवले, चंद्रकांत पड्याळ, काशिनाथ पोसकर, सूर्यकांत म्हसकर, अनिल शिंदे, संदेश टेमकर, शैलेश पांगत, महिला तालुकध्यक्ष विनिता शिगवण आणि महिला कमिटी तसेच तालुका युवकचे योगेश टेमकर, मिलिंद गोरीवले आदींसह समाज बांधव ज्ञातींनी प्रचंड मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg