loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी - कै. मंगल भालचंद्र जोगळेकर. वय - ५९ वर्षे, राहणार - नाचणे, रत्नागिरी यांचे दिनांक - १३/०७/२०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे निधन झाले. त्यांनी फेब्रुवारी २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे देहदान संकल्पपत्र भरले होते. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दिनांक १३/०७/२०२६ रोजी करण्यात आले. सदर देहदान हे २१ वे देहदान होते. कै. मंगल जोगळेकर यांच्या पश्चात मुलगी प्राची सावंत, जावई प्रदीप सावंत व नातवंडे असा परिवार आहे. सदर मरणोत्तर देहदान वेळी मंगल जोगळेकर यांची मुलगी, जावई आणि इतर नातेवाईक उपस्थित उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी व रुग्णवाहिका चालक प्रीतम भोसले यांनी काम पाहिले. सदर देहदानासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनोद सांगवीकर, अतिदक्षता विभाग मधील अधिपरिचारिका प्राजक्ता कोरगांवकर व सौरभ चित्ते यांचे सहकार्य मिळाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg